समृद्धी वेल्फेअर डेव्हलपमेंट फाउंडेशनशी (एसडब्ल्यूडीएफ) जोडलेल्या महिला गटांसाठी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे मानसिक आरोग्यावर अर्ध्या दिवसाचा जागृती कार्यक्रम झाला. ४४ जणांनी (४२ महिला व २ पुरुष) सहभाग घेतला.

श्रीमती पूर्वा जोशी (विदुला सायकॉलॉजिकल कन्सल्टन्सी) यांनी मानसिक आरोग्य व त्याचे महत्त्व, तर डॉ. मानसी देशमुख यांनी मानसिक आरोग्य व समाजमाध्यमे — स्क्रीनचा निरोगी वापर व डिजिटल डिटॉक्स — या विषयावर मार्गदर्शन केले.

संपूर्ण अहवाल वाचा