डेव्हलपमेंट सपोर्ट टीम (डीएसटी), पुणे यांनी ५ व ६ जून २०२६ रोजी औंध येथील डीएसटी कार्यालयात समुदाय कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. डीएसटीच्या विश्वस्त श्रीमती मेधा रानडे, डॉ. अनिल परांजपे आणि प्रकल्प समन्वयक श्रीमती दीपाली क्षीरसागर यांनी प्रशिक्षण दिले.

५ जूनच्या पहिल्या सत्रात समुदाय कार्यकर्त्यांच्या मासिक बैठकीत जुनी सांगवी व दापोडी येथील उन्हाळी शिबिरांचा आढावा घेण्यात आला — विषय, साधन व्यक्ती, वेळेचे नियोजन व शिकलेले धडे. त्यानंतर वैयक्तिक स्वच्छता व स्व-जाणीव या विषयांवर सत्रे व सराव झाला.

संपूर्ण अहवाल वाचा